Milk Protest : जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रात दूध दरवाढीसाठी ‘एल्गार’

0
राहता येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नगर मनमाड मार्गावर माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले.याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के भाजपाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजूरकर ,सचिन तांबे, राजेंद्र पिपाडा, शरद थोरात मुंकूदराव सदाफळ ,प स सभापती नंदाताई तांबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर ,प स सभापती ओमेश जपे,व दुध उत्पादक शेतकरी उपस्तीत होते आदी सहभागी झाले होतै दूध उत्पादकांच्या मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना देण्यात आले(छायाचित्रे:परेश कापसे)

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

दूध दरवाढ व अनुदानासाठी अहमदनगर जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रात भाजप तसेच अन्य पक्षांकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन पेटले आहे. यावेळी भाजपचे नेते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

नगर-सोलापूर महामार्गावर राम शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर राहुरी, श्रीरामपूर येथेही दूधदरवाढीसाठी आंदोलने करण्यात आली. नाशिकमध्ये किसान सभेचे नेते तसेच भाजपचे आंदोलन झाले. यावेळ भाजपच्या आंदोलनावेळी गर्दी जमल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न – माजी आमदार मुरकुटे

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरवाढीसाठी भाजपच्या वतीने नेवासा येथील बसस्थानकाच्या समोरील चौकात शनिवारी दि.१ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ वाजता नेवासा तालुका भाजपच्या वतीने पातेल्यात दूध ओतून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.सदरचे रास्तारोको आंदोलन अर्धा तास चालले.वेळोवेळी आंदोलन करून ही दूध उत्पादकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आघाडी सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलताना केला.

भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, रामभाऊ खंडाळे,नगरसेवक इंजिनिअर सुनीलराव वाघ, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,माजी सरपंच सतीश गायके,निरंजन डहाळे,सुभाष पवार,आदिनाथ पटारे,पोपट शेकडे,विवेक नन्नवरे,ज्ञानेश्वर टेकाळे,भाऊराव नगरे, नगरसेवक सचिन नागपुरे,अशोक टेकणे,अंकुश काळे, आबासाहेब डौले,महेश पवार,शैलेश सुरूडे,रविकांत शेळके,अशोक मारकळी,संदीप पारखे,राजेश कडू,सचिन डौले,सतीश डौले,संदीप आलवणे,विशाल धनगर,मच्छिंद्र रोडे,प्रदीप रोडे,रासपचे गोरक्षनाथ होडगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी
गरीब कुटुंबातील लोकांना दुध वाटप करुन या तिघाडी सरकारचा निषेध नोंदवला यावेळी बेलापूर भाजपा शहर अध्यक्ष श्री प्रफुल्ल डावरे, संघटन सरचिटणीस श्री पुरुषोत्तम भराटे, सरचिटणीस श्री राकेश कुंभकर्ण युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय ( पप्पू ) पोळ यादी उपस्थित होते,
भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने कोल्‍हार घोटी मार्गावर दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांसाठी आंदेलन करण्‍यात आले. याप्रसंगी तालुका अध्‍यक्ष डॉ.अशोक इथापे बोलत होते याप्रसंगी जनसेवा मंडळाचे अध्‍यक्ष भास्‍करराव दिघे, शेतकरी नेते संतोष रोहम, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक रामभाऊ भूसाळ, डॉ.सोमनाथ कानवडे, रासपचे नेते नामदेव काशिद, जि.प सदस्‍या अँड.रोहीणी निघुते, राजेश चौधरी, डॉ.विखे पाटील कृषि परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष सचिन शिंदे, शहर अध्‍यक्ष राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगीरजसिंग परदेशी, परिमल देशपांडे, श्रीराम डेरे, वैभव लांडगे, विठ्ठलराव शिंदे, आदि सहभागी झाले होते. याप्रसंगी दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांचे निवेदन तहसिलदार अमोल निकम यांना देण्‍यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी सभापती दिपकराव पटारे तसेच पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ ऑगस्‍ट २०२० रोजी वेगवेगळ्या ठिकाणी ‘एल्‍गार आंदोलने केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, पंचायत समिती सदस्या कल्याणी कानडे, वैशाली मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन भागडे, माजी सभापती नानासाहेब पवार , गिरीधर आसने, सुनील वाणी , भाजपचे बबनराव मुठे, नगरसेवक सुभाष गांगड, सतिश सौदागर, विशाल अंभोरे, संचित गिरमे, रामभाऊ लिप्टे, राधाकृष्ण आहेर, नानासाहेब तनपुरे, गणेश मुदगुले, चित्रसेन रनवरे, अनिल थोरात, रावसाहेब थोरात, ईश्वर दरंदले,आण्णा शेळके, काशिनाथ तनपुरे, संजय भिसे, दिलीप कवडे, आनंदा थोरात, राहुल पटारे, रमेश धुमाळ युवराज थोरात, प्रसाद सातुरे, सिद्धार्थ साळवे, अमोल जानराव, शंतनु फोपसे नानासाहेब तुपे, मुक्ताजी पटांगरे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी दुध रोडवर ओतून चालू भावाचा निषेद व्यक्त केला. यावेळी भाजपचे शंतनू फोपसे पाटील संतप्त शेतकरी ज्ञानदेव आप्पा बडधे ,
मधुकर फोपसे ,संभाजी फोपसे , गणेश दिवटे,सुदाम बढे, छबू फटांगरे ,धनंजय म्हैस ,
रामभाऊ नाना बडधे,सुनील फोपसे,गणेश फोपसे,मीनीनाथ फोपसे,बाळासाहेब दिवटे,दशरथ तांबे व पप्पू फोपसे यांनी मा.नामदार माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब ,मा.खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच मा.सभापती दीपक आण्णा पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले.

 

भाजपाचे ज्येष्ठ नेते रामरावजी खेडकर,पं.समिती सदस्य प्रकाश खेडकर,जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे,भाजपा तालुका सरचिटणीस इंजिनीयर एम.एन.बडे,किशोरजी खोले,रासपा जि.युवा उपाध्यक्ष ठकाजी कोळेकर,रासपा ता.अध्यक्ष मॅचिंद्र शिंगाडे, ज्ञानदेवआण्णा केदार,सरपंच देवा गरकळ,उपसरपंच गणेश येवले,माऊली पानसंबळ, सावळेराम जायेभाये,विक्रम सोनसळे, ज्ञानेश्वर काळे,अर्जुन कोळेकर, माऊली यमगर,कृष्णा यमगर,अभिलाष गाडेकर आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार व माजी आमदार भिमरावजी धोंडेसाहेब, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेशभाऊ पोकळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार येथे दुध दरवाढीसंदर्भात गोपीनाथ मुंडे (कोळवाडी) चौकात आघाडी सरकार विरोधात तीव्र घोषणा देऊन भारतीय जनता पार्टी व रासपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेवगाव येथील स्व. मुंडे साहेब चौक शेवगाव येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाने व भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, वाय. डी. कोल्हे, राजाभाऊ लड्डा, भीमराज सागडे, संदीप वाणी, सचिन वारकड, कचरू चोथे, रवींद्र सुरवसे,रासपचे आत्माराम कुंडकर, भाजपा महिला आघाडीच्या आशाताई बाबा गरड, उषा संतोष कंगणकर, डॉ. मल्हारी लवांडे, बाबासाहेब गोर्डे, गंगाभाऊ खेडकर, नितीन फुंदे, नितीन दहिवलकर, विनोद मोहिते, शिवाजीराव भिसे, केशव आंधळे, अर्जुन ढाकणे, उमेश धस, मुसाभाई शेख, विजय नजन, अंबादास ढाकणे, विठ्ठल बिडे, जगन्नाथ भागवत, सुरज लांडे, कल्याणराव जगदाळे, गणेश गरड, अनंत उकिर्डे, बाळासाहेब आव्हाड, हभप कल्याण महाराज पवार , तापडिया महाराज, गुरुनाथ माळवदे, सुरज लांडे, नवनाथ अमृत, सुरेश थोरात, मंगेश पाखरे, लोखंडे, विष्णू खोटे आदी

नगर सोलापूर आंदोलनावेळी राम शिंदे हे सरकार म्हणजे, एका नव-याच्या दोन बायका अशी खरमरीत टीका केली.

दुध उत्पादक शेतकरी तसेच अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर महादेवाला अभिषेक करून सरकारला दुध दर वाढीची सुद्धबुद्दी देवो,असे कोंढवड येथील दुध उत्पादक शेतक-यांनी महादेवाला साकडे घालत आंदोलन केले. यावेळी जगन्नाथ पंढरीनाथ म्हसे, जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे, गोरक्षनाथ माळवदे,कोंढवडचे उपसरपंच ज्ञानेश्वर म्हसे,क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे,किशोर म्हसे, गोरक्षनाथ म्हसे,राहुल म्हसे,लक्ष्मण म्हसे,संदीप म्हसे, नंदकिशोर म्हसे,सुरेश म्हसे, भाऊसाहेब पवार,गोपी म्हसे आदी दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीगोंद्यात गरम दूधाचे वाटप करून भाजपाचे आंदोलन
शहरातील शनि चौक येथे आमदार पाचपुते यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते, दादा ढवाण, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे या प्रमुखांनी आंदोलनातभाग घेतला.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, लॉकडाउन काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. दूध व्यवसायाबाबत सरकार शेतकऱ्यांची हेळसांड करीत आहे. आम्ही ही कष्टाने दूध धंदा करतो. त्यामुळे दूध ओतून देण्याऐवजी गरम दुधाचे वाटप करून सरकारचे दूध व्यवसायाकडे लक्ष वेधीत आहोत.

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे काळ्या फिती लावून मोफत दुधाचा वाटप करून अंदोलन, यावेळी बबनराव मुठे डॉ शंकरराव मुठे सोसायटिचे चेअरमन शिवाजी मुठे, सुभाष मुठे मा. पोलीस पाटिल वंसतराव मुठे, प्रा. कोळसे सर,रमेशराव पांचपिड, विश्वास क्षिरसागर,राजु आरगडे,बळीराम मुठे ,रघुनाथ मुठे, लहानु मुठे,डॉ सांवत,दळे,जय मुठे,साईनाथ मुठे,जालिंदर ना मुठे,आप्पा मुठे,सोन्याबापू विधाटे,द्नदेव मुठे, मनोज खैरे, , निलेश विधाटे,बापू पवार,सतिष जाधव, उपस्थित होते

दुधउत्पांदक सध्या दुधसंकलन केद्रावर काळ्या फिती व स्लोगनचे बोर्ड  लावून मोफत दुध वाटप करून आपला संताप व्यक्त करत आहे. दुग्धाभिषेक , शासनाला निवेदन, या मार्गान् सध्या शेतकरी अंदोलन करत आहे . सरकारने प्रश्नाबाबत रास्त तोडगां न काढल्यास पुढे वेगवेगळ्या मार्गाने तीव्र अंदोलन करण्याची घोषणा दुधउत्पांदक शेतकर्यानी केली यावेळी भाजपचे व अशोक कारखान्याचे संचालक बबनराव मुठे यानी शासनाचा घोषना देवून निषेध व्यक्त केला व त्वरीत भाववाढ द्यावी अशी मागणी केली.

आश्वी खुर्द येथे राजहंस दूध संघाच्या दूध टँकर समोर आदोंलन प्रसंगी डॉ. दिनकर गायकवाड, बाळासाहेब भवर, म्हाळू गायकवाड, संजय गायकवाड आदि
मनोली येथे दूध रस्त्यावर ओतुन निषेध
भाजपच्या ‘ एल्गार आंदोलनाला ’ आश्वी पंचक्रोशीतील गावाचा उदंड प्रतिसाद.
राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याचा अंत पाहू नये – भगवानराव इलग.
आश्वी | वार्ताहर
बंद पाण्याची बाटली वीस रुपये व रात्र-दिवस कष्ट करुन दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचे दूध मात्र कवडीमोल भावाने खरेदी करणाऱ्या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का.? असा जळजळीत प्रश्नं भाजपच्या वतीने संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे आयोजित ‘ एल्गार आंदोलना ’ वेळी जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव इलग यानी विचारुन शेतकऱ्याच्या दूधाला ३० रुपये भाव व १० रुपये अनुदानाची मागणी केली आहे. तर राज्य सरकारने आता दूध उत्पादक शेतकऱ्याचा जास्त अंत पाहू नये अशी विनंती केली.
श्रीरामपूर:तालुक्यातील कारेगाव येथे गायीवर दूध ओतून आंदोलन केले
यावेळी माजी सभापती दीपक पटारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष पटारे, कैलास पटारे, जालिंदर होले, महेंद्र पटारे आदि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here