कंगनाचा संताप म्हणाली, सुशांतचे कुटुंबीय केवळ पैशांकडे लक्ष देतायेत पण…

वाचा पुढे काय म्हणाली कंगना

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी कंगनाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. सुशांतचे कुटुंबीय केवळ पैशांकडे लक्ष देतायेत पण इतर गोष्टींकडे त्यांचे दूर्लक्ष होत आहे. यावेळी कंगनाने पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला. 

कंगनाने ट्विट केले आहे, ‘दुर्दैवाने सुशांतचे कुटुंबीय केवळ पैशांच्या गोष्टीवर लक्ष देत आहेत आणि इतर पोस्ट व मुलाखतींकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्यामध्ये सुशांतला घराणेशाहीला समोरे जावे लागले असल्याचे म्हटले होते’ असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर कंगनाने आणखी दोन ट्विट केले आहेत. ‘सुशांतवर निशाणा साधणे सोपे असल्यामुळे त्यांनी असे केले. त्यांनी रणबीर कपूर किंवा वरुण धवन यांच्यासोबत असे का केले नाही?’ या आशयाचे ट्विट करत तिने संताप व्यक्त केला आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ईडीनेही आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रियाची चौकशी सुरु केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here