Shrirampur : उक्कलगाव, बेलापूर बुद्रूक, बेलापूर बन, येथील बिल्वतिर्थाचे पाणी, माती, श्रीराम’जन्मभूमी’च्या भूमिपूजनासाठी अयोध्येला रवाना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री   

श्रीरामपूर – श्रीराम ‘जन्म’भूमी अयोध्या (येथे 5 आॅगस्ट) रोजी होणार्‍या मंदिर निर्माण कार्याला भूमिपूजनाने प्रत्यक्षात शुभारंभ पार पडणार असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व ‘बेलापूर’चे भूमीपूत्र प.पू.स्वामी ‘गोविंद’देवगिरी’ महाराज व देवगडचे महंत प.पू. भास्करागिरी महाराज यांच्यासह प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत.
येथीलच भूमीपूजनासाठी बिल्वतिर्थाचे पाणी, त्रिस्थळीतील बेलापूर बन, बेलापूर बन, उक्कलगावची माती, पुणे येथे बेलापूरातील कारसेवक दिलीप काळे रामप्रसाद व्यास गजानन डावरे व नटवरलाल सोमाणी यांच्या हस्ते पूजन करुन पाठविण्यात आली.
त्याप्रसंगी पूजनीय महेश व्यास अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, बेलापूरचे उपसरपंच रविंद्र खटोड, शहर भाजपाचे उपाध्यक्ष ओमप्रकाश व्यास, रामनाथजी शिंदे, शेखर डावरे, मुन्ना खरात, किराणा व्यापारी संघटनेचे प्रशांत लढ्ढा, गोशाळा सचिव राजेंद्र शर्मा, विशाल मेहेत्रे, लक्ष्मण शिंदे, देविदास देसाई, दिलीप दायमा, विष्णुपंत डावरे, अतिश देसर्डा,  चालक सोमनाथ राशिनकर, आदीसह बेलापूर बन उक्कलगाव, बेलापूर बुद्रूक ग्रामस्थाच्या उपस्थित जल व माती रवाना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here