Rahuri : आंदोलनाचा बडगा उगारताच रस्ता डागडुजीचे काम सुरू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्यासाठी वैष्णवी चौक व अन्य सामाजिक संघटना यांनी आंदोलनाचा बडगा उगारताच रस्त्याच्या डागडुजीची काम सुरू झाले आहे.

नगर मनमाड मार्गावर राहुरी फॅक्टरी येथील स्टेट बॅंकेसमोर पावसामुळे मोठे खड्डे पडल्याने या रस्तावरून वाट काढावी कशी असा प्रश्न वाहन चालकांना पडत होता. खड्ड्यामुळे छोट मोठे अपघात नित्याचे बनले असतानाही जागतिक बँक प्रकल्प अधिकारी याकडे कानाडोळा करत होते.

पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने दुचाकीस्वारांना खड्ड्यचा अंदाज येत नसत. वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील खड्ड्यात मोठा फलक लावून प्रशासनाला कान पिचक्या घेतल्या. एवढ्यावर न थांबता तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वसंत कदम व कार्यकर्त्यांनी दिला असता प्रशासन खडबडून जागे झाले.

काल सकाळी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. रस्त्याच्या लगतच पाणी साचत असल्याने बाजूला नाली काढून पाणी काढून दिले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

86 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here