Beed : …सांग सांग भोलानाथ दुधाला दरवाढ मिळेल काय ?

दुधाची नासाडी न करता बीडमध्ये नंदी बैलाला सहभागी करून बीड भाजपचे अनोखे आंदोलन

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने न्याय दिलाच पाहिजे- राजेंद्र मस्के

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गेल्या अनेक दिवसांपासून शेतक-यांच्या दूध दरवाढ व अनुदानाच्या मागणीसाठी सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप, रासप यांच्याकडून आज जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रात दूध दरवाढीसाठी एल्गार पुकारण्यात आला. मात्र, बीडचे आंदोलन सगळ्यात अनोखे ठरले, ते भगवान शंकराच्या नंदी बैलाच्या सहभागाने… 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभरात माजी आमदार पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध महाएल्गार आंदोलन करण्यात आले. बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदीबैलांच्या साक्षीने दूध उत्पादक शेतकरी व भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करून महाएल्गार आंदोलनात सहभाग घेतला. दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान तर दूध भुकटीसाठी निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करत निद्रिस्त राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला करण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक महादेवाला साक्षात नंदीच्या साक्षीने दुग्धाभिषेक घालण्यात आला.

शेती क्षेत्रातील प्रमुख दुग्ध व्यवसाय डबघाईला आला. डेअरीला दूध घालता घालता पिढी चालली परंतू दुग्ध व्यावसायिकांच्या जीवनात सोन्याचा दिवस उगवला नाही. पैशापायी शेतकरी घरातल्या लेकराला दूध खायला देत नाही. पण डेअरीवर दूध घालतो. तेथे मात्र सरकार दुधाला भाव देत नाही. सरकारच्या निराशजनक धोरणामुळे दुग्धव्यवसाय कोलमडला. वारंवार मागणी करूनही निद्रिस्त राज्य सरकार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय. या सरकारची झोप उडवल्या शिवाय भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषाची दखल घेऊन दूधउत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विजयकुमार पालसिंगणकर, नवनाथ अण्णा शिराळे, शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, भगीरथ दादा बियाणी, विक्रांत हजारे, डॉ लक्ष्मण जाधव, चंद्रकांत फड, प्रा.सचिन उबाळे, सुभाष धस, प्रा.देविदास नागरगोजे, गणेश पुजारी, फारुख भाई ,एड. संगीता धसे, मीराताई गांधले, छाया मिसाळ, लता मस्के, संध्या राजपूत, लता बुंदेले ,विद्या सानप,, शैलजा मुसळे, सोनाली वखरे, शीतल राजपूत, जयश्री रणसिंग, शांतिनाथ डोरले, किरण बाप्पा बांगर, अनिल चांदणे,विलास बामणे, शरद झोडगे, संभाजी सुर्वे पाटील,भूषण पवार, अमोल वडतिले, शरद नवले, संग्राम बांगर, दत्ता परळकर, सुंदर चव्हाण, अशोक मामा घोलप,  हनुमान मुळीक, हरीश खाडे, ,नरेश पवार, बालाजी पवार, रवी गंगावणे, , महादेव बहिरवाळ, प्रवीण पवार, अशोक केंद्रे, सुनिल पवार, अशोक डोईफोडे, बद्रीनाथ जटाळ, महेश सावंत, सरपंच  बाळासाहेब वायभट, वैजनाथ नेवाळे, रामा बांड, वसंत गुंदेकर, महादेव बहिरवाळ, सचिन आगाम, बाळासाहेब थोरात, गोरख घाडगे, कचरू जाधव, पोपट रोहिटे, कल्याण पवार प्रल्हादराव धनवडे, महादेव जमाले, राम चव्हाण, भागवत खाकरे, शरद बडगे, नितीन आमटे, अनिल शेळके, राकेश बिराजदार, महावीर जाधव, अशोकराव घरत, महेश सावंत, छत्रभुज फाळके, विलास सातपुते, गणेश मुळे, बाबुराव कदम, सचिन जाधव, बंडू मस्के, राम काळे,  उद्धव जाधव, सुभाष पितळे, गणेश तोडेकर, पंकज धांडे, आत्माराम बेद्रे, रवींद्र कळसाने, दिलीप डोंगर, भास्करराव सालपे, विशाल भड, आसाराम माळी, व आदी उपस्थित होते.
सांग सांग भोलानाथ दूधाला भाव मिळेल काय ?
दुधाची नासाडी न करता नंदी बैलांच्या सहभागामुळे हे आंदोलन अनोखे ठरले. दूध भाव वाढ, निद्रिस्त सरकारकडून शेतकऱ्यांची होणारी अवहेलना बाबतीत नंदीबैलाला प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नंदीबैल गुबु बु .. गुबुच्या आवाजात मानहलवून उत्तर देत होता. हे कुतूहल वाटत होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here