Rahata : माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 30 जणांवर गुन्हा

दूध दरवाढ आंदोलन करून जमाव बंदी आदेशाचा भंग

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहाता – दूध दरवाढी संदर्भात आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य 30 व्यक्तींवर राहाता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव मिळावा. दुधासाठी दहा रुपये अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी महाआघाडी सरकारच्या विरोधात आज राहाता येथे वीरभद डेरी समोर मजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमू नये, हा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे.

या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राहाता पोलीस नाईक दीपक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, राजेंद्र पिपाडा, कैलास सदाफळ, सचिन तांबे, ॲड रघुनाथ बोठे, नंदकुमार जेजुरकर, नंदा तांबे, यांच्यासह ३० व्यक्तींवर कलम १४३,१८८,२६९,२७०, प्रमाणे बेकायदेशीर जमाव जमून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here