Newasa : सततच्या पावसाने मुळानदी दुथडी भरुन वाहू लागली; भूजल पातळीत विक्रमी वाढ होण्याचा अंदाज

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
पानेगाव – या वर्षी सुरुवातीपासून वरुणराजाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ होत गेली. तसेच तीन दिवसांपासून सातत्याने पडणारा पाऊस यामुळे परिसरातील सर्वच ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. मुळा नदी ही पहिल्यांदाच एवढया लवकर दुथडी भरून वाहण्याचा योग आला आहे. त्यामुळे येथील परिसरात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे.

या अगोदर मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय नदी पात्रात एक थेंबही पाणी सोडत नव्हते. आज परिस्थिती उलटी झाली असून धरण भरण्या अगोदरच नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रात पाणी हे २००५ समन्यायी वाटप कायदा झाल्याने निदान नदीमध्ये पाणी पाहवयास मिळत असे कित्येक वेळेस पोलीस बंदोबस्तात जायकवाडीला पाणी गेले. परंतु नदीवरील बंधारे काय अपेक्षित भरुन मिळाले नव्हते. अशा वेळी हक्काच्या पाण्यासाठी मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीने वेळोवेळी उपोषण, आंदोलने, मंत्रालयात संबंधित विभागाचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, येथील परिस्थिती अवगत करुन त्यावेळी कुठे हक्काच्या पाण्याने नदीवरील बंधारे भरुन मिळायला लागले.

तसेच या वर्षी ही उन्हाळ्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख राज्यमंत्री प्राजक तनपुरे यांनी ही नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यावर्षी मुळाथडी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली नाही. एकंदरीत मोठ्या प्रमाणावर नदीला आलेल्या पाण्याने बळीराजाला अच्छे दिन येणार असून पानेगाव- मांजरीच्या पुलावरुन या अगोदर एकदा पाणी गेले होते. त्यापेक्षा जास्त पाणी येईल, अशी परिस्थिती सध्या निर्माण होते की काय याकडे आता लक्ष लागले आहे.

मुळा नदी ही परिसरातील जननी असून सुरुवातीलाच मुळानदी दुथडी भरुन वाहत असल्याने निश्चितच आनंद तर होतच आहे. परंतु सातत्याने मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीने वेळोवेळी हक्काच्या पाण्यासाठी आंदोलने तसेच शासन दरबारी पाठपुराव्यामुळे युती शासनाच्या काळात ही बंधारे भरुन लागणाऱ्या फळ्या पण मिळाल्या तसेच महाविकास आघाडीने सरकारने ही उन्हाळ्यात बंधारे हक्काच्या पाण्याने भरुन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

लवकरच नदीवर प्रोफाइल वॉलसाठी पाठपुरावा करणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप, उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, कार्यध्दश तथा रासपचे युवा जिल्हाप्रमुख नानासाहेब जुंधारे संघटक विलासराव सौंदोरे सतिश जंगले, गोरक्षनाथ पवार,विठ्ठल जाधव,लक्ष्मण विटनोर,विजय विटनोर,किशन विटनोर, अशोक नांदे, मांजरीचे उपसरपंच सर्जराव विटनोर मांजरी संस्थेचे अध्यक्ष अशोक विटनोर समन्वयक सचिव बाळासाहेब नवगिरे आदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here