राममंदिरासाठी शिवसेनेची एक कोटीची घोषणा मात्र अजून रुपयाही नाही मिळाला

3

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष

राममंदिरासाठी शिवसेना एक कोटी रुपये देणार होती. मात्र, अजून रुपयाही मिळालेला नाही, असे राममंदिर ट्रस्टचे महंत अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

दास म्हणाले, राममंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सारे साधुसंत तयारीत आहेत. आता लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल.

ते म्हणाले की, एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल. यावेळी शिवसेनेने एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, अजून काही माहिती नाही. आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते पण अजून पैसे आले नाहीत. मात्र मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही, असंही ते म्हणाले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here