Breaking News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

राममंदिर जन्मभूमी पूजनाला राहणार नाही उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहा यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली.

शहा म्हणाले, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसल्यामुळे कोरोनाची टेस्ट केली होती. अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे रुग्णालयात भरती होत असून गेल्या काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी ताबडतोब स्वतःला आयसोलेट करून घेऊन चाचणी करावी.

दरम्यान, येत्या 5 ऑगस्ट रोजी राममंदिर जन्मभूमीपूजन व शिलान्यास सोहळा आहे. मात्र, आता कोरोनाचा सकारात्मक अहवाल आल्याने गृहमंत्री शहा आता या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here