अभिषेक बच्चन मात्र रुग्णालयातच

लाखो चाहत्यांच्या दिल की धडकन असलेले महानायक अमिताभ बच्चन यांचा कोविड 19 चा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. अभिषेक बच्चनला मात्र अद्याप डिस्चार्ज मिळाला नाही.
Veteran actor Amitabh Bachchan discharged from hospital after testing negative for #COVID19, announces his son & actor Abhishek Bachchan pic.twitter.com/hvuFvBL1U5
— ANI (@ANI) August 2, 2020
अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि नातं आराध्या यांचाही अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर ऐश्वर्या आणि आराध्या यांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, बीग बी यांचे असंख्य चाहते केवळ त्यांच्या कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना करीत असे. मध्यंतरी अमिताभ कोरोनामुक्त झाल्याचीही अफवा होती. परंतू बिग बींनी स्वतः याचे खंडन केले होते.
आता अखेर ही आनंददायक बातमी मिळाल्याने अमिताभ यांचे चाहते आनंदात आहे. अखेर बिग बींचा अहवाल कोरोना मुक्त आला असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ते थोड्याच वेळात घरी पोहोचतील असे ट्विट करून अभिषेक बच्चन याने ही आनंदी बातमी दिली आहे.