Shirurkasar : विशेष बातमी : निसर्गाचा अद्भुत अविष्कार सूर्याभोवती “इंद्रवज्र”

प्रतिनिधी | जगन्नाथ परजणे |राष्ट्र सह्याद्री 

निसर्गाचा अद्भुत आविष्कार असलेले इंद्रवज्राचे सूर्याभोवतीचे नयनरम्य सप्तरंगी तेजोवलय सर्पराज्ञी परिसरात आकाशात दिसून आले.

तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र  परिसरात आज (2 ऑगस्ट) आकाशात अत्यंत दुर्मिळ भौगोलिक योग असलेले इंद्रवज्राचे सकाळी अकरा चाळीस ते दुपारी बारा दहापर्यंत सुर्यास सप्तरंगी इंद्रवज्राच्या वर्तुळाने पूर्ण वेढलेले होते. इंद्रवज्राचा नयनरम्य अविष्कार कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट होत राहायचा. हे निसर्गाचे रंगीबिरंगी नयनरम्य अविष्काराचे  तेजोवलय जवळपास अर्धातास आकाशात होते. सृष्टीच्या ह्या नवलाईन परिसरात कुतूहल परिसरात निर्माण झालं.

*इंद्रवज्र*

 

संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल “इंद्रवज्रच” असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे, कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वतःलाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते.
-सिद्धार्थ सोनवणे (निसर्गमित्र)
इंद्रवज्रच्या विविध छटा (छायाचित्र सिद्धार्थ सोनवणे)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here