Shrirampur Crime : वाळूमाफियांकडून भाजपचे जिल्हा प्रकोष्टचे संयोजक अजय नान्नोर यांना धमकी 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

वाळूमाफियांची मजल वाढली
श्रीरामपूर – तालुक्यात वाळूतस्कारी जोमाने सुरू आहेत दिवसरात्र शासन गौण खनिजावर वाळूतस्कर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या वाळूची मोठी लूट करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासन कामात व्यस्त, असतानाच वाळूतस्काराची मजल तालुक्यात वाढली आहे.
अवैध धंद्यांना बाबतीत कायमच विरोध करणाऱ्या भाजपचे जिल्हा प्रकोष्टचे संयोजक अजय नान्नोर यांना मांडवे येथिल वाळूमाफियांकडून धमकी दिली आहे.
समजलेले सविस्तर वृत्त असे, मांडवे तालूका श्रीरामपूर येथिल सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे जिल्हा प्रकोष्टचे संयोजक अजय नान्नोर यांना नदीतील ररत्यावरून वाळूची लूट केली जात असल्याची माहिती मिळताच नान्नोर यांनी लुटीबाबत वाळूतस्कारांना जाब विचारल्याने वाळूमाफियांनी त्यांना धमकी देण्यात आली. कायमच अवैध धंद्याविरोधात आवाज उठवत राहणाऱ्या मांडवेतील कायमच नान्नोर यांचा या कामातच पुढाकार राहिला आहे. भाजपचे अजय नान्नोर यांनी महसूल प्रशासनाच्या कानावर हा प्रकार लक्षात आणून दिला असता, महसूल प्रशासनाने येथिल हीच बाब लक्षात घेत नदीकडील जाणार रस्ता जेसीबीच्या साहाय्याने नागंरून टाकत बंद करण्यात आला.
भाजपचे जिल्हा प्रकोष्टचे संयोजक अजय नान्नोर यांना वाळूमाफियाकडून धमकी दिल्याच्या विरोधात भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेत चर्चा करत तक्रारी केल्या आहेत. भ्याड धमकीचा निषेध व्यक्त करत तहसीलदारांना भाजपच्या वतीने निवेदन देत वाळूमाफियावर कठोर कारवाई करावी मागणी केली.
तलसीलदार प्रशांत पाटील यांनी तक्रारीची दखल घेत मांडवे तलाठ्यांना सूचना केल्या आहेत. वरिष्ठाच्या आदेशानुसार रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच भ्याड धमकी प्रकरणी तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी कैलास शिंदे अण्णासाहेब थोरात सुरेश आसने मुकूंद लबडे काका शेलार आदी सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.
तरी वाळूमाफियावर कारवाई न झाल्यास भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखालीलच तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे भाजप कार्यकर्तेकडून सांगण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here