Beed : आता कोविड-19 संदर्भातील तक्रारी दाखल करा थेट औरंगाबाद उच्च न्यायालयात – जिल्हाधिकारी रेखावार

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोवीड-१९ ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात काही तक्रार असेल तर अशी व्यक्ती या बाबतीत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांची तक्रार लिखित स्वरुपात, पोस्टाद्वारे, ई-मेलद्वारे अथवा वकिलामार्फत दाखल करू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
सुमोटो फौजदारी जनहीत याचिका क्र. ०१/२०२० स्वतःहून दाखल करून घेतली असून सदरील याचिका कोबीड-१९ च्या अनुषंगाने दाखल असून सदर याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयाने दिनांक ३१.०७.२०२० रोजी आदेश पारित केला असून सदर आदेशाची माहीती सर्वांना देणे बाबत निर्देश दिले आहेत.

 या आदेशाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, जर कोणास कोविड-१९ ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात खालील काही तक्रारीं बाबत दाखल करता येईल, असे नमूद केले आहे.
तक्रारीचे स्वरुप खालील प्रमाणे असावे,
१. कंटेनमेंन्ट झोन मध्ये आवश्यक वस्तूंचा पुरवठा नसणे.
२. स्वस्त धान्य दुकानामार्फत कार्ड धारकांना आणि इतरांना मालाचा पुरवठा नसणे.
३. रुग्णालयात कोवीड-१९ ची लागण झालेल्या व्यक्तीस दाखल करण्यासंदर्भात त्याचे नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी मदत केंद्र नसणे.
४. सक्षम प्राधिकाऱ्याकडून रुग्णालयात दाखल न करून घेण्यासंदर्भात मदत न मिळणे,
५. अधिकाऱ्याने सांगूनही एखाद्या रुग्णालयाने कोवीड-१९ रुग्णास हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यास नकार देणे.
६. रुग्णालयात देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत काही शंका असल्यास तसेच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या औषधांचा व इंजेक्शनचा औषधोपचारात डॉक्टरांकडून वापर होत नसल्याचे आढळून आल्यास, असे प्रसिद्धीस दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here