Sangamner : कोरोना बाधित रुग्णांची वाटचाल आठशेच्या दिशेने…

आज सायंकाळपर्यंत 12 काल रात्री उशिरा 21 जणांना कोरोनाची बाधा…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ

दिवसेंदिवस संगमनेरमध्ये कोरोनाची वाटचाल जोरात सुरू असून कोरोना बाधित रुग्ण संख्या आठशेच्या दारात येऊन पोहोचली आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीत भर पडत आहे. आज सायंकाळपर्यंत एकूण बाधित रुग्ण संख्या 791वर पोहचली आहे. आज सायंकाळपर्यंत 12 काल 21 तर परवा  दिवसभरात 57 रुग्ण सापडले आहेत. तीन दिवसात एकूण 90 बाधित रुग्ण सापडले आहेत. हा वेग काळजीत भर टाकणारा ठरत आहे.

आज शहरातील मध्यवर्ती अशा विद्यानगरमधील 40 वर्षीय महिला 17 व 16 वर्षीय युवक, ताजणे मळा 41 वर्षीय पुरुष, संजय गांधी नगर 55 वर्षीय पुरुष व 5 वर्षीय बालिका तर तालुक्यातील घुलेवाडी 42 वर्षीय महिला, कोल्हेवाडी 30 वर्षीय पुरूष, गुंजाळवाडी वर्षीय 21 युवक, निमगाव पागा 33 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला 71 वर्षीय पुरुष व सुकेवाडी 57 वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

काल रात्री 21 जणांच्या आलेल्या रिपोर्ट मध्ये संगमनेर शहरातील घास बाजार येथील 77, 51, 68 वर्षीय महिला व 72 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथे 81 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, मालदाड रोड येथील 29 वर्षीय महिला, शहरातील पोलिसांची वसाहत येथील 23 व 22 वर्षीय तरुणी, संजय गांधी नगर येथील 32 वर्षीय इसम, लालतारा हौसिंग सोसायटी येथील 21 व 18 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरुष, विद्या नगर येथील 60 वर्षीय महिला तर तालुक्यातील सुकेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 23 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 27 वर्षीय तरुणी, खराडी येथील 27 वर्षीय तरुण व आज नव्यानेच खांबा येथे 55 वर्षीय पुरूष व चंदनापुरी येथिल 79 वर्षीय पुरुष असे एकूण 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर परवा सायंकाळ पर्यंत एकूण 57 पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात सापडले आहेत. त्यामुळे फक्त या तीन दिवसांचा विचार केला तर एकूण 90 रुग्ण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. हा वाढीचा वेग जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. त्यामुळे संगमनेर कारांच्या काळजीत अधिक भर पडली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here