पुनश्च हरिओम : Mission Begin Again : 5 ऑगस्टपासून राज्य सरकारचा मॉल सुरु करण्याचा विचार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राज्यात येत्या 5 ऑगस्टपासून मॉल पुन्हा सुरू करण्याचा विचार सरकार करीत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांशी चर्चा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर पोलीस महासंचालकांसह अधिका-यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी तपासात पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना केल्या. तर इतर विविध विषयांवर चर्चा केली.

मॉल सुरू केल्यानंतर त्यामुळे कोणकोणती परिस्थिती निर्माण होऊ शकते. काय समस्या येतील, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. सोबतच गणेशोत्वानिमित्त कोकणात जाणा-या चाकरमान्यांची पास व गाड्यांच्या व्यवस्थेबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here