RamMandir : राममंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारींना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राममंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारीं यांना देण्यात आले आहे. राममंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांनी हे निमंत्रण पाठविले आहे. त्यांच्याबरोबरच मुस्लिम पक्षकार हाजी महबूब आणि बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाल्यावर अंसारी म्हणाले की, या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालं आहे. याचा फार आनंद आहे. मी या कार्यक्रमात नक्की सहभागी होणार आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने ही जागा रामललाच्या भव्य मंदिरासाठी दिली आहे. आता यासंदर्भात कुठलाही वाद नाही. ते म्हणाले की, मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामांविषयी आदर आहे. त्यांनी म्हटलंय की, कदाचित  भगवान रामांची इच्छा असावी की, मंदिर भूमि पूजनाचं पहिलं निमंत्रण मला मिळावं, मी याचं स्वागत करतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here