Pathardi : तालुक्यातील मोहज देवढे परिसरात चिंकारा हरणाची शिकार; आरोपी पसार

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवढे येथील वनविभागाच्या क्षेत्रात जाळी लावून चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात आरोपींकडून शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका हरणाची शिकार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास मोहोज देवढे येथील वन जमिनीवर हरणाची शिकार करण्यासाठी शिकारी दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. त्या महितीच्या आधारे पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांना तात्काळ मोहोज देवढे येथे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत.

शिकाऱ्यांचा शोध घेतला असता वन जमिनीवरील जंगलात एका ठिकाणी जाळी लावून अज्ञात चार ते पाच शिकारी हरणाची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, वनविभागाच्या कर्मचा-यांना पाहून शिकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. वनपाल बबन मंचरे, वनरक्षक वर्षा गीते, वनकर्मचारी लक्ष्मण ढोले, बाबू मरकड, इंद्रभान चितळे, श्रीधर काकडे यांनी माघ घेतला परंतु येथून पळून जाण्यास शिकारी यशस्वी झाले.

घटना ठिकाणी शिकारीसाठी लावलेली जाळी व त्यामध्ये अडकलेले मृत हरण, असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून जप्त करण्यात आलेली. तेथील जाळी नष्ट करण्यात आली संबंधित अज्ञात शिकाऱ्यांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला असून हरणाची हत्या करणाऱ्या शिकाऱ्याबाबत वनविभागास महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून लवकरच शिकाऱ्यांना पकडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांनी सांगितले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here