Shrigonda : बाजारभाव नसल्याने शेतात लिंबाचा सडा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशीर्वादाने श्रीगोंदा तालुक्यात लिबाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले असून यामुळे शेतकरी हताश झाला आहे. 

श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या फळबागा आहेत. त्यात सर्वात जास्त लिंबू बागा आहेत. त्यामुळे तालुक्याला लिंबूचे आगार समजले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून हे लिंबाचे आगार मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहे. तालुक्यात लिंबाचा प्रत्येकी तीन ते पाच रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील लिंबू काढून ते व्यापाऱ्यांना नेऊन देण्यासाठी परवडत नाही.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात लिंबोणीच्या बागेत लिंबाचे सडे पाहण्यास मिळत आहेत. शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकरी सध्या रानात लिंबू गोळा करण्यास टाळाटाळ करत आहे. परिणामी शेतात लिंबू सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र अडचणीत सापडले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here