Sangamner : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढण्यात वन विभागाला यश…

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री  

तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील शेतकरी नितीन मोहळे यांच्या शेतातील अरुंद विहिरीत पडलेला बिबट्याला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप विहिरीतून वर काढले या बिबट्याला तालुक्यातील निंबाळे येथील रोपवाटिकेत उपचारासाठी नेण्यात आले आहे.

काल सकाळी नितीन मोहळे यांच्या वस्तीवरील कुत्र्याचे पिल्लू रात्रीच्या वेळी बिबट्याने उचलून नेल्यामुळे त्यांनी सकाळी आपल्या शेतातील अवास्तव उगवलेल्या बाबळी काढण्यासाठी जेसीबी बोलावला या जेसीबीचे काम चालू असताना त्यांनी सहज आपल्या विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसले.

त्यांनी तातडीने गावचे सरपंच, ग्रामस्थ व वनखात्याला बिबटया विहिरीत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर वनखात्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी अथक प्रयत्न करून, रेस्क्यू अभियान राबवून या बिबट्याला सुरक्षित विहिरीतून बाहेर काढले व त्याला निंबाळे येथील रोपवाटिकेत नेण्यात आले आहे. या रोप वाटिकेत या बिबट्या वर उपचार करण्यात येणार आहे, असे यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here