Lifestyle : कर्जतमध्ये मॅचिंग मास्क बनत आहे स्टाईल स्टेटमेंट

शिवण व्यावसायिक शाकीर शेख यांची संकल्पना 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कोरोनाच्या महामारीच्या काळात सगळीकड़े जग बदलत आहे. यात लोकांच्या जीवनशैलीसह व्यावसायिक स्वरूपही बदलत असल्याचे दिसत आहे. याच बदलत्या स्वरूपाचा एक भाग म्हणजे कर्जतमधील एक शिवण व्यावसायिकाने शिवलेल्या कपड्यासोबत त्याच कापडाचा मॅचिंग मास्क ग्राहकांना देण्याची योजना सुरु केल्याने ग्राहकांमध्ये याची चर्चा आहे.
कर्जत येथील स्टाईल टेलरचे संचालक शाकिर शेख या शिवण व्यावसायिकाने ग्राहकाने शिवण कामासाठी टाकलेल्या कपड्या सोबत त्याच कापडाचा मॅचिंग मास्क देण्याची संकल्पना सुरु केली आहे. मूळ ही संकल्पना त्यांच्या स्वतःची असल्याने हे मास्क पाहता ग्राहकही समाधान व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क ही एक अत्यावश्यक बाब असल्याने यातून निश्चितच सुरक्षा मिळत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन शिवलेल्या कपड्यासोबत टेलरने त्याच कापडाचा मॅचिंग मास्क दिल्याने एक प्रकारे त्यांच्या या संकल्पनेने ग्राहकांची काळजी घेण्याचा प्रयत्न आहे.
-भाऊसाहेब कोळेकर, ग्राहक
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी मास्क ही आवश्यक बाब आहे. शासनही काळजी घेण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन करीत आहे. त्यामुळे आपण ग्राहकांना मास्क देऊ अशी संकल्पना सुचली आणि यातून ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच आपला नफ़ा आणि कमाई असेल.
-शाकीर शेख, टेलर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here