Twitter War : सुशांत आत्महत्येचा तपासाबाबत ट्विटवरून सौ फडणविसांचे शिवसेनेसोबत रंगले युद्ध

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरून सौ. फडणविसांनी मुंबई पोलिसांवर ट्विटरवरून निशाणा साधला. यावरून शिवसेना आणि सौ. फडणवीस यांच्यात पुन्हा ट्विटरवरून युद्ध रंगले आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांमध्ये माणुसकी राहिली नाही. तसेच मुंबई आता सुरक्षित राहिली नाही. असे ट्विट केले.

यावर शिवसेनेच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली. “मुंबई पोलिसांवर आरोप करुन बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करु इच्छिते की, त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडावी. त्यांनी खासगी सुरक्षा एजन्सींकडे जावं, जिथे त्यांना सुरक्षित वाटेल. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने अशाप्रकारचं वक्तव्य करणं लाजिरवाणं आहे”, असा घणाघात प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here