Newasa : कोरोना बाधित पोलिसाचा मृत्यू, तालुक्यात खळबळ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – नेवासा तालुक्यातील पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोना योध्याचा हा नेवासा तालुक्यातील पहिलाच बळी ठरल्याने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका अधिका-यासह काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याने त्यांना नेवासा येथे कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असतानाच त्याची प्रकृती खालवल्याने नगर येथे हलवण्यात आले होते. पण आज संध्याकाळी अखेर या योद्ध्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांबरोबर नागरिकांत देखील कोरोनाची भीती बळावली आहे. तरी जनतेने घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

नेवासा येथील कोविड केंद्रात एक महिला आरोग्य अधिकारी कोरोना किट परिधान करुन कोरोना बाधीत रुग्णांवर औषधोपचार करत आसतांना सोमवार (दि.३) रोजी सायंकाळी त्यांनी हा ड्रेस परिधान केल्यामुळे त्यांना भोवळ येवून उपचार करणाऱ्या महिला अधिकारीच पडल्यामुळे आरोग्य विभाग या महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचार करण्यात व्यस्त झाला होता. आता या महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांची प्रकृती सुधारत आसल्याचे तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here