Home corona Shrigonda : शहर तीन दिवस लॉकडाउन

Shrigonda : शहर तीन दिवस लॉकडाउन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून एकट्या शहरात कोरोनाची रूग्ण संख्या 53 झाली असून शहरात वाढलेली रुग्ण संख्या पाहून शहरातील व्यापारी संघटनांनी तहसिलदार महेंद्र माळी यांच्या दालनात प्रांतअधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शहर 3 दिवस लॉकडाउन करण्याची मागणी केली.
मात्र, प्रांत अधिकारी भोसले यांनी लॉकडाऊनची मागणी फेटाळत नागरिकांनी स्वयमस्फूर्तीने लॉकडाऊन केले. तर प्रशासनाची त्यासाठी कोणतीही हरकत नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख नेते यांनी निर्णय घेत शहर उद्यापासून 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनबरोबर घेतला त्याला सर्व व्यवसायिकांनी मान्यता दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, सुरेश भंडारी, दक्ष फाऊंडेशनचे दत्ताजी जगताप, अमोल दंडणाईक, आनंद कटारिया, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव उपस्थित होते. या स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या बंदला सर्वांनी सहकार्य करावे व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळे दुकान सर्व दुकाने बंद ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे यांनी केले. शहरात तसेच तालुक्यात विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार असल्याचे यावेळी पो. नि. दौलतराव जाधव यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here