Shrigonda : कोरोनाचा तालुक्यातील तिसरा बळी, महिलेचा मृत्यू 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील उखलगाव येथील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला असून सदर महिला पारनेर तालुक्यातील सूपा येथे उपचार घेत होती. तालुक्यात एकूण ३ कोरोना रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

तर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून तालुक्यात आजपर्यंत २६७ रुग्ण कोरोना बाधित झाले. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू होऊन एकट्या श्रीगोंदा शहरात ६० पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडून नागरिकांच्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

यामुळे उद्यापासून ३ दिवस श्रीगोंदा शहरातील अत्यावश्यक आस्थापना वगळता सर्व बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here