Ahmednagar breaking : शिवसेनेचे उपनेता व माजी आमदार अनिल राठोड यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे कोरोनावर उपचार सुरू असताना आज पहाटे 5.30 वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून नगरच्या साईदीप हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असताना त्यांना आज पहाटे ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा विक्रम राठोड , मुली, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here