कट्टर शिवसैनिक, माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

1

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर – शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचं आज सकाळी ०६.३० च्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं . मृत्यू समयी त्यांचं वय ७३ वर्षांचं होतं.

शिवसेनेची शाखा नगर शहरात स्थापन कारण्यापासून अनिल राठोड यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेच्या असंख्य शाखा उघडल्या. शिवसेनेच्या पायाभरणीत त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. त्यांच्या कामाची दखल घेत १९९० साली त्यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले. एक पेक्षा जास्त वेळा सलग आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा आहे. १९९० ते २०१४ पर्यंत सलग ५ वेळा सातत्याने चढत्या मताधिक्याने विजयी होणारे ते पहिलेच आमदार ठरले. त्यांची शिवसेनेवरची निष्ठा पाहून त्यांना १९९५ साली मंत्रिमंडळात घेण्यात आले. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अनिल राठोड यांनी अन्न व नागरी पुरवठा , राज्यमंत्री म्हणून कामं पहिले .

२०१४ साली त्यांच्या पराभव झाल्यानंतर ते शिवसेनेत सक्रिय राहिले. शिवसेनेत त्यांची उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात अली होती. त्यातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अगदी अलीकडच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात त्यांनी गोरगरिबांसाठी स्वतंत्र अन्नछत्र चालवले. अनेक ठिकाणी जीवनावश्य्क वस्तूंचा पुरवठा केला. गेल्या आठवड्यात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. आज पहाटे ०६. ३० च्या दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली.

अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी २ मुली, एक मुलगा, सून व जावई असा परिवार आहे.

1 COMMENT

  1. भावपूर्ण अभिवादन
    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही पार्थना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here