Ram Mandir : अखेर तो क्षण आला, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ज्या ऐतिहासिक क्षणाची समस्त देश आतुरतेने वाट पाहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची तयारी सुरू होती. अखेर तो क्षण आला आहे. दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी अभिजीत मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमी पूजनाला सुरुवात झाली आहे.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडे नऊ वाजता दिल्लीवरून निघाले. ते साडेदहा वाजता ते अयोध्येला पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. सर्व भक्तांच्या वतीने मोदींना त्यांनी राम-राम केले. त्यानंतर मोदी यांनी प्रथम हनुमान गढीला जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदी यांनी रामलल्ला यांना साष्टांग दंडवत घातला.

ठीक 12 वाजून 12 मिनिटांनी अभिजीत मुहुर्तावर जन्मभूमीपूजन सोहळ्याला सुरुवात झाली. 12 वाजून 44 मिनिटांनी प्रत्यक्ष भूमिपूजन होईन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी विशेष सामाजिक अंतराचे नियम पाळत हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचे अयोध्येत लएडीद्वारे 48 ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here