Ayodhya : Ram Mandir : राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर 29 वर्षांनी पंतप्रधान मोदी अयोध्येतून बोलणार…

29 वर्षापूर्वी म्हणाले होते आता मंदिर निर्माण कार्य सुरु होईल तेव्हाच पुन्हा येईन 

थोड्याच वेळात भाषण सुरू

तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंदिर निर्माण कार्याचा तो क्षण आला. आज बुधवारी 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाचा अतिशय शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले. त्यानंतर शिलान्यास करण्यात आला. चांदीचं फावडं, तर चांदीची वीट पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी वापरण्यात आली. या सोहळ्यानंतर थोड्याच वेळात प्रधानमंत्री अयोध्येतून भाषण करणार आहेत. ते 29 वर्षानंतर अयोध्येतून बोलणार आहेत. 

नरेंद्र मोदी १९९१ मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. तेव्हा महेंद्र त्रिपाठी यांनी काढलेल्या फोटोत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदीदेखील कॅमेऱ्यात कैद झाले होते. नरेंद्र मोदी भाजपाचा मुख्य चेहरा म्हणून समोर आल्यानंतर हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. महेंद्र त्रिपाठी त्यावेळी विश्व हिंदू परिषदेसाठी फोटोग्राफर म्हणून काम करत होते. रामजन्मभूमीजवळच त्यांचा स्टुडिओ होता.

‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले होते. ही यात्रा कन्याकुमारीमधून सुरु झाली होती. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधितही केलं होतं. महेंद्र त्रिपाठी यांनी त्यावेळी मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार ? असं विचारलं असता ज्या दिवशी राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल तेव्हा मी पुन्हा येईन असं उत्तर दिलं होतं.

योगयोगाने यावेळी ते प्रधानमंत्री पदावर विराजमान असल्याने त्यांच्याच हस्ते भूमिपूजन पार पडत आहे. नरेंद्र मोदी २९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेलं ते आश्वासन पूर्ण करत असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत हजर झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here