Ayodhya Live : राममंदिर निर्माणाची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सीयावर रामचंद्र की, अन अयोध्येसह देशात जय श्रीरामाचा जयघोष

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्याचा अभिमान- पंतप्रधान मोदी

राममंदिर निर्माण प्रक्रिया म्हणजे ही राष्ट्राला जोडण्याचे काम आहे, राम मंदिर हे संपूर्ण भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

राम मंदिर आंदोलन सुरू झाल्या पासून ज्यांनी ज्यांनी यासाठी बलिदान केले त्यांचे सर्वांचे स्मरण करून 130 करोड भारतीयांच्या वतीने त्यांना नमन करतो. राम मंदिर भूमिपूजनाचा अद्भूत सोहळा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान हे देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी सीयावर रामचंद्र की जय म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

कोणत्याही कामासाठी आपण प्रेरणेसाठी प्रभू श्रीरामांकडे पाहतो. -अनेक शतके टेंटखाली राहिलेल्या रामलल्ला यांच्यासाठी एक भव्य मंदिर उभं राहत आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं नाही असं एकही ठिकाण नव्हतं. 15 ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानांचं प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतकं, अनेक पिढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचंच प्रतिक आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

-राम जन्मभूमी ट्रस्टने मला येथे आमंत्रित करुन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारत एक सुवर्ण इतिहास रचत आहे. आज पूर्ण भारत राममय आहे. पूर्ण देश रोमांचित झाला आहे. प्रत्येक मनात दीपमय झालंय. आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपत आहे. कोट्यवधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here