प्रभू श्रीरामाचे मंदिर देशाच्या सामुहिक शक्तीचं प्रतीक बनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  0

  प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आज भूमीपूजन व शिलान्यास सोहळा सुफळ, अयोध्येसह संपूर्ण देश राममय

  आज अनेक वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी संकटाच्या चक्रव्यूहातून मुक्त झाली. भारत शरयू नदीच्या तीरावर स्वर्णिम अध्याय रचत आहे. प्रभू श्रीराम मंदिराचे मंदिर देशाच्या सामुहिक शक्तीचे प्रतिक बनेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  आज दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी प्रभू श्रीराम मंदिर भूमीपूजन व शिलान्यास सोहळा सुफळ झाला. त्यानंतर मंचवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.

  यावेळी अखेर राम जन्मभूमी संकटांच्या चक्रव्यूहातून मुक्त झाली आहे. प्रभू श्रीरामांचे मंदिर देशाच्या सामुहिक शक्तीचे प्रतिक बनेल. ते म्हणाले की,  श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया  राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

  यावेळी समस्त राम भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्या.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here