Shrigonda : घारगांवात पुन्हा एक करोनाबाधित रूग्ण आढळला…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा तालुक्यातील घारगांव येथे आज एकजण करोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर या रूग्णाशी संबंधित कुटुंबातील ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

संबंधित रूग्ण रांजणगाव MIDC येथे खाजगी कंपनीमध्ये कामासाठी जात होता. दोन दिवसांपासून त्यास घशामध्ये त्रास जाणवत होता.त्यामुळे आज श्रीगोंदा घेण्यात आलेल्या रॅपीड अॅंटीजन चाचणीमध्ये संबंधित रूग्ण करोनाबाधीत आढळला. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच घारगांव येथील एकाच कुटुंबात आढळलेले ८ करोनाबाधीत रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी आल्याने घारगांव करोनामुक्त झाले होते. परंतु आज पुन्हा एक नवीन रूग्ण सापडल्यामुळे सध्या घारगांवकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here