सुशांत सिंह राजपूत : सीबीआयकडे सुपूर्द !

3
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची केस अखेर सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. केंद्राने बिहार सरकारची सीबीआय चौकशीच्या शिफारसीची मागणी मंजूर केली आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वकिलांनी ही माहिती दिली. आता या केसची सीबीआय चौकशी होणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी ही मागणी सोशल मीडियावर लावून धरण्यात आली होती. तसेच सुशांतच्या वडिलांनीही ही मागणी बिहार सरकारकडे केली होती.
केंद्र सरकारचे वकिल एस. जी. तुषार मेहता यांनी सुप्रिम कोर्टात माहिती दिली की, या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी. ही बिहार सरकारची मागणी केंद्राने मंजूर केली आहे. रिया चक्रवर्ती हिच्या वतीने वकिल श्याम दीवान यांनी बाजू मांडली असून त्यांनी सांगितले की, कोर्टाने रियाच्या याचिकेकडेही लक्ष द्यावे. तसेच सुशांतसंबंधीच्या सर्व याचिकांवरील सुनावणीवर स्थगिती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here