मुंबईत वादळी वार्‍यासह तुफान पाऊस

  0

  विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
  मुंबई : मुंबईसह उपनगरात कोसळणार्‍या पावसाने दुपारनंतर प्रचंड वेग पकडला. राज्यभरात पावसाने हाहा:कार माजवला असताना, इकडे मुंबईत सोसाट्याच्या वार्‍याने घबराट पसरली. तुफान पाऊस आणि वेगवान वार्‍यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली
  मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
  मुंबई आणि मुंबई उपनगर
  मुंबईत वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबई उपनगरात जोरदार पाऊस पडला. दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली गोरेगााव अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसाचा चांगलाच परिणाम झालेला दिसला. जोरदार पावसाने वातावरण इतकं अस्पष्ट झालं होतं की गाडी चालकांना लाईट लावून गाडी चालवावी लागली.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here