Rahuri : कृषी विद्यापीठाचे ‘शेतकरी निवास’ बनले गुन्हेगारांचे उपचार केंद्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | राजेंद्र उंडे

राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ‘शेतकरी निवास’ मध्ये जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अटक केलेल्या गुन्हेगारांची कोरोना चाचणी केली असता 66 गुन्हेगार कोरोना बाधीत आढळले आहेत. या सर्वांवर कृषी विद्यापीठातील ‘शेतकरी निवास’ मध्ये उपचार करण्यासाठी ‘शेतकरी निवास’ मध्ये तात्पुरते स्वरुपात कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. तेथे जिल्हाभरातील अटक केलेल्या गुन्हेगारांवर उपचार करण्यात येत आहे. ‘शेतकरी निवास’ बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख अखीलेशकुमार सिंह यांनी कृषी विद्यापीठातील ‘शेतकरी निवास’ मधील  कैद्यांच्या कोवीड केअर सेंटरच्या सुरक्षेची पाहणी केली. जिल्ह्यातील पाच ठिकाणच्या कारागृहात कोरोना बाधीत झालेल्या तब्बल ६६ सराईत गुन्हेगारांवर ‘शेतकरी निवास’ मध्ये तात्पुरती व्यवस्था केली. त्यामुळे, कृषी विद्यापीठातील ‘शेतकरी निवास’ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरेक्षेच्या द्रुष्टीने ‘शेतकरी निवास’ इमारतीवर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे, कृषी विद्यापीठ परिसर अतिसंवेदनशील झाला आहे.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात आटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात येत असून अनेक पोलिस ठाण्यात गुन्हेगार कोरोना बाधीत आढळत आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांवर एकाच ठिकाणी उपचार करता यावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी नगर येथे जिल्हा कारागृहा जवळील एक शाळा अधिग्रहित केली आहे. तेथे कोरोना बाधीत कैद्यांसाठी कोवीड केअर सेंटर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कृषी विद्यापीठातील ‘शेतकरी निवास’ मधील  कैद्यांना लवकरच जिल्हा कारागृह जवळील शाळेत हलविण्यात येणार असल्याचे समजते.

राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील कृषी पदवीधर व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे सरकारने यापूर्वी अधिग्रहित केली. याठिकाणी राहुरी तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार व कोरोना संशयित व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली आहे.

‘शेतकरी निवास’ मध्ये 66 गुन्हेगारांवर उपचार

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अटक असलेल्या कैद्यांची तपासणी करण्यात आली. अनेक पोलिस ठाण्यात अटक असेलेल्या कैद्यांना कोरोना बाधीत असल्याचे तपासणी अहवालात नमुद करण्यात आले. बाधीत कैद्यांवर राहुरी कृषी विद्यापीठातील ‘शेतकरी निवास’ मध्ये उपचार करण्यात येत आहे. कैद्यांची संख्या पुढील प्रमाणे : राहुरी 2, लोणी : 1,श्रीरामपूर :19, पारनेर :26, नेवासा : 18 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here