Beed : क्षीरसागर बंधूंचा विकास कामांचा धडाका एकाच दिवशी तीन कामे सुरु

2
शहरवासीयांनो विकास कामाची वचनपूर्ती करणारच – माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन ही कामे करण्याची आश्वासने आपण दिलेली आहेत. ती कामे आपण पूर्ण करणारच आहोत शहरातील विकास कामे आता सुरू झाली आहेत. आगामी काळात ती करून घेण्याचे प्रयत्न चालू आहे विकास कामांची वचनपूर्ती आपण करणारच असल्याचे मत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

बीड शहरातील बार्शी रोड वरील धांडे नगर, सावता नगर आणि स्वराज नगर येथे माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते मुख्य व अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या भागातील समस्यांवर चर्चा केली. तसेच सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम अत्यंत उत्तम दर्जाचे आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, शहरातील नागरिकांना ज्या विकासकामांचा शब्द दिला आहे. त्या विकास कामांची वचनपूर्ती आपण करणारच आहोत सत्ता हे साधन आहे साध्या नाही. त्यामुळे आगामी काळातही शहरातील या कामांची प्रस्ताव आपण दिलेले आहेत. ती कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्याच वेळी बीड शहरासाठी पाच कोटी रुपयांचे कामाचे प्रस्ताव आपण त्यांच्याकडे दिले होते. त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली असून लवकरच पुढची प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे ती कामे देखील करून घेणार आहोत, असेही माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बोलताना म्हणाले की,धांडे नगर रस्त्याचे काम दर्जेदार आणि भविष्यात वाखाणण्याजोगे होणार आहे. हा रस्ता डी पी रस्त्याअंतर्गत होत असून स्वराज्य नगर आणि सावता नगर पुर्वचे काम हे दलित वस्ती सुधार योजनेतून करत आहोत ,आता स्थानिक नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपल्या घरासमोर व दुकानासमोर रस्त्याच लगत प्रत्येकी पंधरा फुटांवर एक झाड लावून त्याचे संगोपन करावे जेणेकरून त्याचा भविष्यात फायदा होईल.
यावेळी धांडे नगर, सावता नगर येथील रहिवाशांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले आणि आंनद व्यक्त केला.
यावेळी कृषी ऊ. बा. समितीचे सभापती दिनकर कदम,नाना धांडे,बाळासाहेब अंबुरे,माजी सभापती अरुण नाना डाके,विलास बडगे,सुनिल सुरवसे,नगरसेवक नरसिंग नाईकवाडे,गणेश वाघमारे,बप्पासाहेब घुगे,सागर बहिर,संगिता चव्हाण,दिलीप गोरे,नितीन धांडे, सभापती रवींद्र कदम, नगरसेवक विनोद मुळुक, झुंजार धांडे,शैलेश जाधव,बाळासाहेब घोडके, अतुल काळे,प्रमोद शिंदे,कपिल सोनवणे, प्रवीण सुरवसे,रवी शिंदे,पिंटू माने,अनिल देवतरासे,संतोष चरखा, आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

2 COMMENTS

  1. There are some fascinating deadlines in this article however I don’t know if I see all of them center to heart. There’s some validity but I’ll take hold opinion till I look into it further. Good article , thanks and we would like more! Added to FeedBurner as effectively

  2. My partner and I absolutely love your blog and find almost all of your post’s to be what precisely I’m looking for. can you offer guest writers to write content to suit your needs? I wouldn’t mind publishing a post or elaborating on a number of the subjects you write about here. Again, awesome website!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here