Ahmadnagar : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

“माजी राज्यमंत्री शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समजले. अत्यंत दुःख झाले. स्व. अनिलभैय्या यांनी पाच वेळा नगर शहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. जनतेच्या प्रश्नावर अतिशय पोटतिडकीने भांडणारा, प्रसंगी संघर्ष करणारा नेता आपल्यातून गेला.
अत्यंत लोकप्रिय असलेले राठोड यांच्या निधनाने कार्यतत्पर, लोकमानस जाणणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी व माझे कुटुंबीय राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अनिल राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here