Sangamner : तालुक्याची रुग्णसंख्या पोहोचली 850 च्या जवळ, आज सात नवे रुग्ण…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आज दुपारनंतर संगमनेरमध्ये एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल रात्री (मंगळवारी) उशिरापर्यंत 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या 848 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीत दिवसेन दिवस भर पडत आहे.

आज दुपारनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार निमोणमधील 42 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 31 वर्षीय तरुण, शहरातील इंदिरानगरमधील 65 वर्षीय महिलेसह, 33 वर्षीय तरुण, रंगारगल्लीतून 46 वर्षीय इसम, घासबाजारातील 54 वर्षीय व्यक्ती, गांधी चौक 42 वर्षीय तरुण कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरातील पहिल्या टप्प्यात तालुक्याची रुग्णसंख्या सातने वाढून 848 वर पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा 23 कोरोना बाधित रुग्णाची भर पडली आहे.त्यात रात्री उशिरा पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील भरीतकर मळा येथील 61 वर्षीय व्यक्ती, मालदाड रोड येथील 63 वर्षीय व्यक्ती, देवी गल्ली येथील 55 वर्षीय व्यक्ती, तालुक्यातील वेल्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 24 वर्षीय तरुण, कौठे बुद्रुक येथील 42 वर्षीय पुरुष,  खराडी येथील 28 वर्षीय तरुण, तालुक्यातील घुलेवाडी येथील 25 वर्षीय तरुण, आश्वि बुद्रुक येथील 50 व 45 वर्षीय पुरुष,  जांबुत खुर्द येथील 62, 64 व्यक्ती व 20 वर्षीय तरुणासह 60 वर्षीय महिला, निमोण येथील 54 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिलेसह 20 व 30 वर्षीय तरुण, शहरातील अभिनव नगर भागातील 68 वर्षीय महिला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

तर पुन्हा दुसऱ्यांदा खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात आणखी 6 जण बाधित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शहरातील ऑरेंज कॉर्नर परिसरातील 46 वर्षीय पुरुष, इंदिरानगर मधील 23 वर्षीय तरुण, 52 व 45 वर्षीय पुरुष, 41 व 49 वर्षीय महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर काल एकूण 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. अशी कालची 23 रुग्ण संख्या तर आजची रुग्ण संख्या 7 असल्याने तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 848 वर जाऊन पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here