Ahmadnagar Corona Updates : जिल्ह्यात आज ३८५ रुग्णांना डिस्चार्ज, ३८ नवे रुग्ण 

अहमदनगर : जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली. 
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३८ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  श्रीगोंदा ०१ – बेलवंडी फाटा  ०२, श्रीरामपूर १७ – शहर १६, श्रीरामपूर सब जेल ०१, राहुरी ०२ – देवळाली प्रवरा ०२,  मनपा ०५ – शहर ०४, केडगाव ०१,  कॅन्टोन्मेंट ०५, पारनेर ०५ – डिकसळ ०१, वाडेगव्हाण ०१, देवीभोयरे ०१, पारनेर ०१, पाडळी ०१, नेवासा ०१,  कोपेरगाव ०२ – खडकी ०१, शिंगणापूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८९, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी २५, नगर ग्रा.२४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २४, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले २, शेवगाव २, कोपरगाव ३, कर्जत १९.
बरे झालेले एकूण रुग्ण:४९६५
उपचार सुरू असलेले रूग्ण:२२६३
*मृत्यू: ८८*
*एकूण रूग्ण संख्या: ७३१६*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here