Newasa : सोनईसह अठरा गावची पाणी योजना पुन्हा बंद; पावसाळ्यात पाण्याचा वनवास

1

साडेपाच लाखाची पाणीपट्टी थकली

प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री 

सोनईसह अठरा गावासाठी असलेली पाणी पुरवठा करणारी योजना पाणीपट्टी थकल्याने पुन्हा बंद झाली असून यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सगळी कडे पाणीच पाणी झाले आहे. शेतकरी पावसाला वैतागला आहे. शेतातील पीक जास्त पाण्याने सडली आहेत. पण सोनई, करजगाव, शिरेगाव खेडले, परमानंद यासह अठरा गावच्या गावक-यांवर मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी आली असून योजना अपूर्ण असल्यामुळे अठरा गावच्या ग्रामपंचायत ही योजना ही योजना हस्तांतरीत करायला तयार नाहीत.

गत वेळेसही कामगारांचे वेतन न मिळाल्याने ही योजना जवळपास महिनाभर बंद होती. गेल्यावर्षी शंकरराव गडाख यांनी योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी ऊंबरे पिंप्री अवघड या गावात व काही हॉटेलला अनिधिकृत पाणी जोडणी आहे. ती तत्काळ बंद करावी यासाठी सोनईमध्ये रस्तारोको केला होता. त्यावेळी तीन महिन्यात ही योजना पूर्ण करुन बेकायदा जोडणी बंद करण्याचे आश्वासन जल प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिले होते पण अद्यापही परिस्थिती जैसै थे तशीच असून आता साडेपाच लाख रुपये पाणीपट्टी थकल्याने योजना बंद करण्यात आली असून सोनईच्या नशिबी पुन्हा पावसाळ्यात पाण्याचा वनवास आला असून गेल्या पाचसहा महिन्यापासून कोरोनाचा प्रभाव असून लॉकडाऊन असल्यामुळे गावात वसुली होत नाही.

त्यामुळे ग्रामपंचायत पाणी पट्टी भरु शकली नाही आणि पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था देखील करु शकत नाही, अशी खंत ग्रामविस्तार अधिकारी बटुळे यांनी सांगितले. याबाबतीत जि.प. सदस्य सुनील गडाख व ना शंकरराव गडाख योग्य तो निर्णय घेऊन सोनईसाठी लवकरच पाणी पुरवठा सुरु करु, असे बटुळे यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here