Rain Updates : मुंबईसह पालघरला पावसाने झोडपले, कोल्हापूरातही मुसळधार

0

मुंबईत अवघ्या चार तासात 300 मिमि पाऊस – मुंबई महापालिका आयुक्त 

मुंबई पालघरला मुसळधार पावसाने झोडपले असून कोल्हापूरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत अवघ्या चार तासात 300 मिमी पाऊस कोसळला आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त यांनी दिली आहे.

चांदोली धरणातून 4400 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार : धरणातून 3000 तर वीजनिर्मिती केंद्रातून 1400 क्यूसेक्स असा एकूण 4400 क्यूसेक्स पाणी वारणा नदीत सोडण्यात येणार : आज दुपारी 2 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचं गुरूवारचं कामकाज तहकूब, बुधवारी पावसामुळे अडकून पडलेला कोर्टातील कर्मचारी वर्ग सकाळी घरी पोहोचल्यानं घेतला निर्णय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here