Shrigonda : कोरोनाचा चौथा बळी; येळपणे येथील 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – कोरोनामुळे आज येळपणे येथील एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तालुक्यात आत्तापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तालुक्यात आज दिवसभरात एकूण 24 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात श्रीगोंदा शहरात विविध भागात 6, हंगेवाडी 8, येळपणे 1, अजनुज 1, देवदैठण 2, पारगाव 1, मढेवडगाव 4, बेलवंडी 1 असे रुग्ण मिळून आले आहेत. तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 332 एवढी झाली असून 224 लोक बरे होऊन घरी गेले आहेत तर 108 लोकांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here