Shrigonda : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी – संतोष रायकर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टी ची नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील रहिवासी तरुण भाजपचा कार्यकर्ता. संतोष रायकर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी ही नियुक्ती केली आहे.

भाजपाने प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्ते यांना पक्षाने ही संधी दिली आहे. संतोष रायकर यांनी 2000 साली भाजपचे काम चालू केले. शाखा अध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तालुका संघटक सरचिटणीस भाजपचे विस्तारक पंचायत समितीची उमेदवारी… असे तालुक्यात पक्ष वाढीसाठी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शना खाली काम केले आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी ओबीसी व इतर लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचे विचार आचार लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी जिल्हाभर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्याला दिलेल्या संधीचे सोनं करणार असल्याचे व जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्व खाली काम करणार असल्याचे रायकर यांनी सांगितले आहे.
तसेच यांना कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षाने जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची दखल पक्षाकडून घेतली जाते.

या निवडी बद्दल माजी मंत्री पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते संघटन मंत्री किशोरजी कालकर भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे प्रदेश कार्यसमिती सदस्य प्रा. भानुदास बेरड सर, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, अभय आगरकर, सुनील रामदासी, वंसत लोढा, नामदेव राऊत, युवा नेते, विक्रमसिंह पाचपुते, प्रसादजी ढोकरीकर संतोष लगड, दिलीप भालसिंग, दत्तात्रय हिरनवाळे, श्यामराव पिंपळे बाळासाहेब महाडिक,  आदी रायकर यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here