प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा तालुक्यातील मूळचे पारगाव सुद्रिक या ठिकाणी राहणारे सावता नाना हिरवे यांची रोहित पवार युवा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीने त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी शेती बरोबर सामाजिक हिताची जाण तसेच विविध सामाजिक कामात अग्रेसर असणारे तसेच समाज्यासाठी अहोरात्र झगडणारे सावता हिरवे यांनी यांची रोहित पवार युवा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तसेच संघटनेची ध्येय धोरणे व फुले शाहू आंबेडकर विचार तसेच आमदार रोहित पवार साहेबांचे कार्य व विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला व संघटना वाढीसाठी जास्तीत जास्त युवकांची फळी तयार करून संघटना वाढीस बळकटी द्याल, अशी आशा बाळगून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राकेश कोते यांनी दिले आहे. या निवडीनंतर हिरवे यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता.