ग्रामस्थांचे म्हणणे, अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
वाकड़ी- श्रीरामपूर रस्त्यावरील असलेल्या रेल्वेच्या यशवंतबाबा चौकी येथिल भुयारी मार्गावर रेल्वे रुळ ओलांडत असताना मेंढ्याना रेल्वे इंजिनची जोरदार धडक बसून ४० मेंढ्या मृत झाल्या. ही घटना काल (गुरुवारी) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
मागील काही दिवसापूर्वी ही अशीच घटना घडली होती. या मृत झालेल्या मेंढ्यामध्ये गाभण मेंढ्या ही होत्या. काही मेंढ्याच्या पोटातुन पिल्ले बाहेर पडलेले होते सुमारे चार ते पाच फुट ऊँचीवर पावसाचे पाणी साचल्याने सुमारे ४५ ते ५० मेंढ्याचा मालक असलेल्या मेंढपाळने हीच जनावरे रेल्वे रस्ता ओलंडण्यासाठी रेल्वे रुळ वरुण नेत असताना विणा डब्बे असलेले भरधाव इंजिन सुमारे ३५ ते ४० मेंढ्याना जोराची धड़क देत पुढे गेले. यात सुमारे ५०च्या पुढील मेंढ्यापैकी ३५ ते ४० मेंढ्या सर्व रुळवर छिन्न विछिन्न अवस्थेत मृत पडल्या.
या ठिकाणच्या भुयारी मार्गात पाणी नसते तर त्याच मेंढ्या रुळावरुण न जाता भुयारी मार्गातून गेल्या असत्या व त्यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे अकार्यक्षम असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या चुकीने हा दुर्दैवी अपघात घडला असून यास रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मेंढपाळ आपला उदारनिर्वाह या मेंढ्या्च्या भरवशावर करत होता. आता त्याला उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने सर्व नातेवाईक तेथेच टाहो फोङत होते. दरम्यान, अशीच घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्यावेळेस ही मेंढ्या मृत झाल्या होत्या.