फेसबुक लाईव्हवर त्याने केला आपल्या आत्महत्येचा टेलिकास्ट

0

आत्महत्येसाठी कॅमेरा सेट करताना अनेक मेसेज त्याला येत होते पण त्याने केले दूर्लक्ष

पालघर : एका 22 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जव्हारमध्ये घडली. नवनाथ बोंगे असं या तरुणाचं नाव आहे. तो वाडा तालुक्यातील वीरा या गावचा रहिवासी होता. (Navnath Bonge facebook live suicide)

नवनाथ बोंगे हा जव्हार येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. तो हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्येच राहायचा. गुरुवारी दुपारी त्याने फेसबुक लाईव्ह सुरु केलं. त्याआधी त्याने पंख्याला नायलॉन दोरी टाकून फास तयार केला होता. मोबाईल सेट करुन आपली आत्महत्या कॅमेऱ्यात येईल, अशा बेताने तो कॅमेरा सेट करत होता.

त्याचं हे कृत्य पाहून अनेक जण त्याला फोन करत होते. खाली कमेंटही येत होत्या. मात्र नवनाथने त्याकडे दुर्लक्ष करुन, आत्महत्या केली. आत्महत्यादरम्यानचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नवनाथच्या या टोकाच्या कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. फेसबुकवरुन हा व्हिडीओ अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर पोहोचला.

नवनाथने आत्महत्या का केली याबाबतचं कारण समजू शकलेलं नाही. या आत्महत्येची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात झाली आहे. मात्र सोशल मीडियावर लाईव्ह करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here