Ahmadnagar : जिल्ह्यात २२ नवे रुग्ण, ३६८ जणांना डिस्चार्ज

5
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर : जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३०  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३  इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६६.१९ इतकी आहे.
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये  कोपरगाव ०१ – टाकळी फाटा ०१,  मनपा ०५ – मुकुंदनगर ०१,. विनायकनगर ०१, सिव्हिल हडको ०१, संजय नगर ०१, पोलीस मुख्यालय ०१, नगर ग्रामीण ०३ – घोगरगाव ०१, केडगाव ०१, जेऊर ०१, कॅन्टोन्मेंट ०६, शेवगाव ०१, राहुरी ०१ , कर्जत ०१ – मल ठण ०१, नेवासा ०१ – खेडले काजळी ०१, पारनेर ०२- पिंपळगाव तुर्क ०१, पारनेर ०१, श्रीगोंदा ०१ – उक्कलगाव ०१.
दरम्यान, आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ०७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३,  श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी ०१,  शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १५
*बरे झालेले एकूण रुग्ण:५३३३*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२६३०*
*मृत्यू: ९४*
*एकूण रूग्ण संख्या: ८०५७*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here