Shrigonda : कोविड सेंटर सुरू

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सध्या कोरोनामुळे जनता हैराण झाली आहे उपचाराआभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. तर शासकीय कोविड सेंटरमध्ये सुविधांची वानवा आहे. 
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना शहरात जाऊन उपचार घेणे हे मोठे कठीण आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. अशातच पारगाव येथे स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. होले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयुर्वेद रिसर्च सेंटरमध्ये आजपासून आता सुसज्ज असे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजन सुविधा असणारे 40 बेड असून सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, 24 तास तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, स्टाफ, पेशंटसाठी योगासने, झुंबा डान्स, जेवणासह आंघोळीसाठी गरम पाणी, मोफत वायफाय सुविधा, निसर्गरम्य वातावरण अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांसाठी ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. शासनाच्या आरोग्य विभागाच्या मान्यतेने हे सेंटर सुरू करण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार, शासकीय दरानुसार या कोविड सेंटरमध्ये उपचार होणार आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांवर तालुक्यातच उपचार होणार असून उपचाराआभावी कोणत्याही कोरोना रुग्णाची होणारी गैरसोय ही टाळली जाणार आहे. त्यामुळे डॉ. होले हॉस्पिटलमधील हे कोविड हेल्थ सेंटर कोरोना रुग्णांसाठी वरदान व उपयुक्त ठरणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here