Techno : शिरूरकासार तालुक्यात जिओने जीव सोडला!

0
मोबाईल धारक वैतागले, ईतर कंपन्यांकडे ग्राहक वळू लागला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

खालापुरी – तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून जिओ कंपनीचे टॉवर सुरू झाल्यापासून मोबाईल धारक चांगली सेवा मिळत असल्याने खूश होता. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसापासून सेवेचा बोजवारा उडाला असल्याने अनेक ग्राहकांनी ईतर कंपनीला पसंती दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, राज्यात मोबाईल सेवेचे प्रसारण तात्कालिक केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रमोद महाजन
यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील परळी येथून झाले. त्यावेळी फक्त शासनाची बी एस एन एल कंपनी होती. पण काही कालावधीत खाजगी कंपनीन्यांनी सुरुवात केली.
अनेक आमिष दाखवून मोबाईल धारकांना आपल्या जाळ्यात ओढले काही दिवस यांनी चांगली सेवा दिल्यामुळे ग्राहक आकर्षित झाला. परंतु आता मात्र मोबाईल धारक जूनं ते सोनं अस म्हणून बीएसएनएल, आयडिया या कंपनीकडे वळू लागला आहे. गेली सहा ते सात दिवसांपासून संपूर्ण शिरूरकासार तालुक्यात जिओच्या मोबाईल सेवेना जीव सोडला असल्याने तीन महिने, एक महिना, वर्षाचे बँलेन्स टाकलेल्या ग्राहकांची आता गोची झाली असून ईतर मोबाईल कंपनीच्या पर्यायी शोधत आहे. याची जान जिओ कंपनीच्या प्रमुखांनी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here