Karjat : कोरोना द्विशतक पार, शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ कोरोनाबाधित आढळले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कर्जत तालुक्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांनी एकाच दिवशी विक्रमी संख्या गाठली असून तब्बल ३६ रुग्णाचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी द्विशतक पार केले असून आजमितीस कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या २२० झाली आहे. 

तालुक्यात शुक्रवारी दि ७ रोजी कर्जत एकाच दिवशी तब्बल ३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. प्रथमत: कर्जत तालुक्यात एकाच दिवशी ३६ रुग्ण मिळाले आहे. यामध्ये मलठण १२, माहीजळगाव ५, मिरजगाव ९, राशीन ६, अलसुंदे २, कुळधरण १ आणि बाभूळगाव दुमाला येथील १ रुग्णाचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा आकड्याने द्विशतक पार केले असून एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या २२० झाली आहे.
यामध्ये कर्जत शहरातील २३ तर ग्रामीण भागातील १९७ कोरोनाबाधीत रुग्णाचा समावेश आहे. आजतागायत कर्जत तालुक्यातील आठ कोरोनाबाधीत व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अजून ९ व्यक्तीचा कोरोना अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here