Kada : साहिल करणार जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व 

प्रतिनिधी | राजेंद्र जैन | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील धानोरा येथील एकवीस वर्षीय साहिल शेख हा तरुण दि. 23 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2020 दरम्यान बेलारूस देशात होत असलेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सामान्य कुटुंबातील तरुणाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी, ही बाब आष्टीकरांसाठी अभिमास्पद ठरली आहे.

आष्टी तालुक्यातील धानो-यासारख्या लहान गावातील साहिल शेख हा तरुण आपल्या कर्तृत्वाने महान ठरला आहे. वर्ल्ड आणि एशियन या दोन्हीही पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी 93 किलो वजनी गटात साहिल देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो धानोरा येथील महाविद्यालयात बीएससीच्या तिसऱ्या वर्गात त्याचे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन: 2017 पासून 2019 पर्यत सलग तीनदा साहिलने सुवर्ण पदक पटकावले आहे.

मागील नोव्हेंबर 2019 मध्ये मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत एक सिल्वर आणि दोन सुवर्णपदक मिळलेत तर डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत दिल्ली येथे सिल्वर पदक घेऊन साहिल शेख अनेकदा आष्टीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

भारतासाठी “गोल्ड मेडल” आणावं…
साहिल हा खुप ध्येयवादी असून “वयाच्या एकवीस व्या वर्षी त्याने अथक परिश्रमातून  यश संपादन केले आहे. अभिमान वाटावा असं अविस्मरणीय कार्य करून दाखवले. माझ्या देशासाठी गोल्ड मेडल जिंकून आणावे, हीच देवाला प्रार्थना आहे.
-डाॅ. राज शेख, वडील

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here